Camping in Nainital | Nainital | Day 1 | नैनिताल भटकंती - दिवस पहिला | Places to Visit in Nainital | How to reach Nainital from Lucknow

लखनऊ मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर संधी मिळाली ते देशातील प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट देण्याची. ते म्हणजे उत्तराखंड राज्यातील नैनिताल (Famous hill station of India, Nainital). तब्बल चार दिवसांच्या या भटकंतीमध्ये नैनिताल व तसेच आजूबाजूच्या भागातील अनेक लहान-मोठ्या तलावांना भेटी देणे, नैनीताल पासून थोडे दूर पण निसर्गाच्या सानिध्यात कॅम्प साईटला राहणे, तसेच वॉटर ऍक्टिव्हिटी पासून ते घोडस्वारी पर्यंत आणि गुहेपासून ते मंदिरापर्यंत, असे बरेच काही आम्हाला अनुभवता आले. त्याच भटकंतीचा हा ब्लॉग. 

नैनिताल भटकंती सिरीज - दिवस पहिला
लखनऊ ते नैनिताल प्रवास आणि कॅम्पिंग 

camping in nainital

नैनिताल येथे कसे जायचे? (How to reach Nainital?)
नैनीतालला जाण्यासाठी काठगोदाम हे जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway to reach Nainital, Kathgodam) व तेथे पोहोचण्यासाठी लखनऊवरून (How to reach Nainital from Lucknow!) ट्रेन उपलब्ध आहेत. पण काठगोदाम पर्यंत रिझर्वेशन न मिळाल्यामुळे, जवळपास 40 किलोमीटर अंतर अगोदर असलेल्या किच्छा (Kichcha railway station) ह्या स्टेशनला आम्ही उतरलो. 

kichha station
किच्छा स्टेशन येथे आम्ही

स्टेशन पासून शेअरिंगने हलद्वानी गाठले. येथून नैनितालला जाता येते (How to reach Nainital from Haldwani!). कॅब केली आणि नैनितालला निघालोत. नैनिताल पासून जवळपास 12 किमी अंतरावर बजून (Stay near Nainital - Bajoon village) हे गाव आहे. तिथे एका कॅम्प साईटला (Nainital Nature Campm Bajoon) आम्ही आमची राहण्याखाण्याची सोय केली होती. 

Nainital Nature Camp Site
Nainital Nature Camp Site

आम्हाला हॉटेलमध्ये स्टे नव्हता करायचा. आम्हाला असंच काही जिथे कॅम्पिंगची सुविधा (Campsite in Nainital) असेल, अशा ठिकाणी आम्हाला राहायचे होते. त्यामुळे आम्ही नैनिताल पासून दूर येथे आलो. खूप offbeat ही जागा होती. मेनरोड पासून जवळपास शंभर दोनशे मीटर आत, पूर्णपणे जंगलामध्ये यावे लागते. बाहेरून कोणाला ओळखू येणार नाही अशी आत मध्ये कुठे एक जागा आहे. आम्हाला फार आवडलं. प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी थोडा वेळ आराम केला होता आणि मग जेवण झालं. आता आम्ही नैनीताल मॉल रोडला (Nainital Mall Road) निघालो. 

Nainital Mall Road
नैनीताल मॉल रोड

मार्केट फिरून झाल्यावर पुढील तीन दिवसांच्या भटकंतीसाठी बाईक भाड्याने (Bike on rent at Nainital) घेतल्या आणि पुन्हा कॅम्प साईटला आलो. नैनिताल भटकंतीच्या पहिल्या दिवसाचा आनंदात समारोप केला.

camping in nainital
Bonfire at Campsite

या सिरीजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी नैनिताल भटकंती येथे क्लीक करा.

याच भटकंतीचा यूट्यूब विडिओ पाहण्यासाठी लखनऊ ते नैनिताल प्रवास आणि कॅम्पिंग येथे क्लिक करा.

जय शिवराय

#nainital #camping #campsite #uttarakhand #NainitalBhatkanti #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu