नैनीताल भटकंती सिरीज - दिवस दुसरा
घोडेस्वारी, रॅप्पेल्लिंग आणि नैनिताल बोटिंग
"नैनीताल भटकंती" या सिरीज अंतर्गत नैनिताल मधील पर्यटन स्थळांची आपण भटकंती करत होतो. मागील भागात "लखनऊ ते नैनिताल प्रवास आणि कॅम्पिंग" याचा ब्लॉग तर आपण वाचलाच असेल. या भागात आपण आम्ही काही तलावांना दिलेल्या भेटी आणि Water Activities, तसेच हिमालयान वनस्पती उद्यान, घोडस्वारी, रॅपलिंग आणि नैनिताल तलावातील बोटिंग, असा बरच काही पाहणार आहोत.
सकाळी लवकरच आमचा दिवस सुरु झाला. कॅम्प साईट येथे छान नाश्ता केला आणि आम्ही नैनितालच्या दिशेने निघालो. कुठे कुठे जायचे याचा प्लॅन असा काही आम्ही केला नव्हता. जे काही वाटेत लागेल तिथे थांबायचे ठरले. कॅम्प साइट पासून नैनीतालला जाताना एक सुंदर तलाव आमच्या नजरेस पडला. तो म्हणजे खुरपाताल (Khurpatal Lake). तलावातील पाण्यापासून येथील परिसर सर्वांमध्येच वेगळेपण जाणवत होते.
|
Khurpatal Lake |
थोड्या अंतरावरच सरियाताल (Sariyatal Lake) नावाचे लहान तलाव आहे. येथे बऱ्याच water activities होतात. त्यापैकी झिपलाइनचा (Zipline at Sariyatal Lake) आम्ही अनुभव घेतला.
|
Zipline at Sariyatal Lake |
पुन्हा नैनितालकडे जाणाऱ्या मार्गाला लागलोत. आता आम्ही पोहोचलो हिमालयन वनस्पती उद्यान्याला (Himalayan Botanical Garden). पूर्णपणे नापीक झालेल्या जमिनीवर अशा प्रकारचे उद्यान उभारणे नक्कीच आव्हानात्मक राहिले असावे. या उद्यानात हिमालयातील दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या वनस्पतींचे संवर्धन, विकास आणि जागरूकता इत्यादी सोबतच शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. पर्यावरणीय पर्यटनाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने एक उत्तम प्रकल्प.
|
Himalayan Botanical Garden |
या मार्गावर काही व्ह्यू पॉइंट देखील लागतात. या पॉईंट जवळच घोड्याने टिफिन टॉप पॉईंट (Horse Ride to Tiffin Top point of Nainital) पर्यंत जाण्याची सुविधा आहे. जवळपास 5 किमी प्रवास, घनदाट असे जंगल, वाटेतील काही पॉईंट्स आणि सर्वात रोचक अनुभव म्हणजे टिफीन टॉप जवळील व्ह्यू पॉइंट वरून रॅपलिंग करणे (Rappelling at Tiffin Top point of Nainital).
|
Horse Ride to Tiffin Top Point |
|
Photos in Local Outfit |
मी ह्या अगोदर अशा प्रकारची एडवेंचर ऍक्टिव्हिटी केलेली नव्हती. सुरुवातीला आपल्याला जमणारच नाही असेच वाटले. पण हळूहळू मार्गदर्शकाने सांगितल्याप्रमाणे रॅपलिंग करता आले. साहसी पण रोमांचक अनुभव.
|
Rappelling at Tiffin Top Point |
कॅम्प साइट ते नैनीताल प्रवासादरम्यान इतकं काही पाहायला, अनुभवायला मिळाले की, नैनिताल पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. म्हणून दिवसाचा शेवट आम्ही नैनीताल तलावामध्ये बोटिंगने (Boating in Nainital Lake) केला. सर्व बाजूंनी डोंगरांनी घातलेला वेढा, सूर्य मावळतीला, अल्लाददायक आणि थंड अशी हवा.
अतिशय रम्य संध्याकाळ.
|
Boating in Nainital Lake |
नैनिताल भटकंती सिरीज मधील दुसऱ्या दिवसाची भटकंती येथे संपते.
जय शिवराय
#nainital #boating #horseride #rappelling #camping #uttarakhand #NainitalBhatkanti #BharatBhatkanti
0 Comments