Nainital Bhatkanti - Day 3 | नैनिताल भटकंती | Naukuchiatal | Bhimtal | Sattal lake | Kayaking | Day wise plan for Nainital

नैनिताल भटकंती सिरीज - दिवस तिसरा 
नौकुचियाताल, भीमताल आणि सातताल तलाव

"नैनिताल भटकंती" या सिरीज अंतर्गत नैनिताल मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची आपण भटकंती करत होतो. मागील भागात कॅम्पिंग, घोडस्वारी, तलावांच्या भेटी, वॉटर ऍक्टिव्हिटीज, रॅपलिंग, बोटिंग असं बरंच काही यांचा ब्लॉग आपण वाचलाच असेल. या भागात आपण नैनिताल तलावापासून थोडे दूर जाऊन अन्य काही परिचित-अपरिचित अशा तलावांना दिलेल्या भेटी, तेथील वॉटर ऍक्टिव्हिटीज हे सर्व पाहणार आहोत. 

bhimtal naukuchiatal sattal lakes nainital

बजून येथील आमच्या कॅम्पसाईट (Camping in Naimital) पासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर नकोच यातल होते. डोंगरदऱ्यातील प्रवास जितका सुंदर तितकाच जोखमीचा. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवत आम्ही प्रवासाचा आनंद घेत होतो. 

photoshoot in nainital
मार्गात एका पॉईंटजवळ काढलेले फोटोज

नौकुचियाताल येथे पोहोचणारच होतो की तेवढ्यात आकाशात भरारी घेतलेले Paragliders दिसले. आम्ही विचारपूस केली असता पॅराग्लाइडिंगसाठी (Paragliding in Nainital) भरपूर waiting असल्याचे कळाले. म्हणून आम्ही पुन्हा नौकुचियातालच्या दिशेने निघालो. नौकुचियातालला लागूनच कमळताल (Kamaltal Lake) नावाचे छोटेसे तळे आहे. हंगामा दरम्यान हे तळे पूर्णपणे कमळांनी भरून जात असावे. 

kamaltal lake nainital
Kamaltal Lake

आकाराने प्रचंड मोठा, स्वच्छ पाणी, निसर्गरम्य परिसर आणि पर्यटकांनी गजबजलेला हा नौकुचियाताल तलाव (Naukuchiatal Lake). येथे आम्ही कायाकिंगचा (Kayaking in Nainital) आनंद घेतला. 

Naukuchiatal Lake nainital
Naukuchiatal Lake
Kayaking in Naukuchiatal Lake nainital
Kayaking in Naukuchiatal Lake

आलो त्या वाटेवरच भिमताल तलाव (Bhimtal Lake) आहे. भीमताल तलावापासून भवालीकडे जाताना डावीकडील एक वाट खालच्या दिशेने सातताल तलावाकडे जाते. 

Bhimtal Lake nainital
Selfie at Bhimtal Lake
Bhimtal Lake nainital
Bhimtal Lake

ह्याच वाटेला अपरिचित असा गरुडताल तलाव (Garudtal Lake) लागतो. धोकादायक असल्याने फार निवडक पर्यटक येथे येतात. सातताल (Sattal Lakes) याचा अर्थ सात तलाव असा असून याच सात तलावांच्या समूहातील गरुडताल हा एक तलाव. दिवसभर गजबजलेल्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आम्हाला हवा असलेला विरंगुळा येथे मिळाला. 

garudtal lake nainital
Garudtal Lake

जवळच सात ताल समूहातील अन्य तलाव पाहायला मिळतील. 

Sattal Lakes nainital
Sattal Lakes

पुन्हा नैनीताल पोहोचेपर्यंत रात्रच झाली. नैनीताल भटकंतीतील आणखीन एका रम्य दिवसाचा शेवट नैनीताल शहराच्या या अप्रतिम दिशेने झाला.

Nainital city night view
Nainital City Night View

याच भटकंतीचा यूट्यूब विडिओ पाहण्यासाठी नैनिताल भटकंती - दिवस तिसरा येथे क्लिक करा.

या सिरीजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी नैनिताल भटकंती येथे क्लिक करा.

जय शिवराय 

#nainital #boating #sattal #bhimtal #garudtal #naukuchiatal #paragliding #NainitalBhatkanti #BharatBhatkanti #Uttarakhand
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu