नैना देवी मंदिर | Nainital Bhatkanti - Day 4 | Naina Devi Temple | Eco Cave Garden | नैनिताल भटकंती | Best Places to visit in Nainital

नैनिताल भटकंती - दिवस चौथा 
इको केव्ह गार्डन आणि नैना देवी मंदिर 

नैनिताल भटकंती ह्या सिरीज अंतर्गत नैनिताल मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची आपली भटकंती सुरु होती. मागील तीन दिवसाची भटकंती ज्यात कॅम्पिंग, घोडेस्वारी, वॉटर ऍक्टिव्हिटी, रॅप्पेल्लिंग, बोटिंग, अनेक परिचित-अपरिचित तलावांच्या भेटी यांचा ब्लॉग तर आपण वाचलाच असेल. ह्या भागात आपण नैनिताल मधील नैसर्गिक खडकाळ गुहांचा समूह असलेल्या इको केव्ह गार्डन व भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक असे नैना देवी मंदिर यांना भेट देणार आहोत.

naina devi temple

नैनिताल मधील इको केव्ह गार्डन (Eco Cave Garden of Nainital) म्हणजे निसर्ग व माणूस यांच्या एकत्रित प्रयत्नांचे उत्कृष्ट उदाहरण. नैसर्गिक खडकाळ गुहांचा समूह (Natural rock caves in Nainital) असणाऱ्या या ठिकाणाचे रूपांतरण एका बागेत केले आहे. नैनिताल शहराच्या जवळ असल्यामुळे हे ठिकाण सध्या बरेच लोकप्रिय होत आहे.

Map of Eco Cave Park of Nainital
Map of Eco Cave Park of Nainital

या बागेत प्राण्यांच्या आकारात तयार झालेल्या सहा गुहांचे भव्य दृश्य पाहायला मिळते. Tiger Cave, Panther Cave, Porcupine Cave, Bats Cave, Flying Fox Cave, Appes Cave ही येथील गुहांची नावे.  

Natural Caves of Eco Cave Park
Natural Caves of Eco Cave Park

गुहेतील लॅम्प, ऑडिओ इफेक्ट्स, गुहेचा अस्सलपणा टिकवण्यासाठीचे केलेले प्रयत्न व येथील शीत हवा या ठिकाणाचे सौंदर्य आणखीन वाढवतात. जर तुम्ही नैनिताला भेट देण्याची योजना आखत असाल तर या ठिकाणाला नक्कीच चुकवू नका. 

Natural Caves of Eco Cave Park

नैनिताल तलावाच्या काठावर वसलेले येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि भारतातील 51 शक्तिपीठांपैकी (Shaktipeeth of India) एक असे नैना देवी मंदिर आहे. मंदिर परिसरात येतात भगवान हनुमान आपल्याला आशीर्वाद देतात. 

Naina Devi Temple
Naina Devi Temple

मुख्य मंदिरा व्यतिरिक्त अन्य बरीच मंदिरे येथे पाहायला मिळतात. या मंदिराच्या पौराणिक महत्त्वामुळे लोकांची देवीवर नितांत श्रद्धा आहे. 

तब्बल चार दिवसांच्या नैनिताल भटकंतीचा आनंदाने शेवट करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. भटकंती सुंदर होतीच पण त्यात आणखीन भर पडली ते आम्हाला सोबत लागलेल्या माणसांमुळे. त्यात विशेष उल्लेख म्हणजे कॅम्पसाईट येथे आमची सुविधा पाहणारे लोक आणि सौगंध व देबलीना हे आमच्या सोबत आलेले जोडपे.  

ह्याच सिरीजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी नैनिताल भटकंती येथे क्लीक करा.

याच भटकंतीचा यूट्यूब विडिओ पाहण्यासाठी नैनिताल भटकंती - दिवस चौथा येथे क्लिक करा.

जय शिवराय

Blog by - Vinod Kamble
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu